महाराष्ट्र

परिवर्तन कवितेच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयावर महेश कोळेकर यांची जनजागृती…

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448

कवी महेश बजरंग कोळेकर यांनी आपल्या कलेचा वापर करून आपल्या कवितेच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती करण्याचे मोलाचे असे कार्य केलेले आहे. सोशीलमीडिया या कवितेमुळे जनजागृती होत असताना दिसून येत आहे. यामध्ये कवी महेश कोळेकर यांनी स्वच्छता चे महत्व पटवून दिले आहे. तसेच झाडे लावा, झाडे जगवा, प्राणवायू चे महत्व, पाणी आडवा, पाणी जिरवा, पाण्याचा जपून वापर करा यावर त्यांनी कवितेच्या ओळी मांडल्या आहेत. हुंडाबळी थांबली पाहिजे, रक्तदान करूया, प्रत्येक मुलीला शिकवूया, माणुसकी जपुया, एक भारत श्रेष्ठ भारत अशा अनेक सामाजिक विषयावर त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे कार्य केलेले आहे. आज त्यांच्या या सामाजिक विषयावरील जनजागृती च्या काव्याला खूप मोठा प्रतिसाद ही मिळत आहे. संपूर्ण सोशीलमीडियावर कवी महेश कोळेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
परिवर्तन

हाती घेऊन खराटे
करू स्वच्छता देशाची।
पेरू सुविचार देशात,
स्वच्छता करू मनाची।

लावू झाडे अंगणी
करू हिरवीगार धरती।
प्राणवायू मिळेल आपल्याला,
निळेभोर आकाश वरती।

वापरू पाणी जपून
घेऊ काळजी मातीची।
अन्न धान्य पिकवते,
काळजी घेऊया शेतीची।

बंद करूया हुंडाबळी
मुलगी शिकवूया घरोघरी।
ज्ञानाचा प्रकाश येईल,
इथल्या प्रत्येक दारोदारी।

नका वाया घालवू
रक्ताचा एकही थेंब।
रक्तदान आहे महान,
फुलविल जीवनाचे कोंब।

अवयवदानाची किमयाच न्यारी
नाही जाळून टाकायच।
अवयव करायचं दान,
नाही मातीत पुरायच।

सगळे जातीधर्म एकच
का करायचे भांडण।
यामुळेच तर होते,
तव माणुसकीचे मुंडन।

नाय करायची वृक्षतोड
नाही जाळायचे जंगल।
काळ्या काळ्या मातीवर,
करूया सगळं मंगल।

व्हायला पाहिजे साक्षर
सगळेजण घेऊन शिक्षण।
नाही थांबायचं कोठे,
नाही राहायचं निरक्षर।

हातात हात घालून
माणुसकीन एकमेकांशी वागायचं।
काळजात जय हिंद लिहून,
भारत माता की जय म्हणायचं।

कवी-महेश बजरंग कोळेकर
रा-काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-धाराशिव.
संपर्क- 9579228347

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button