समाजातील सामाजिक व स्वंयसेवी संस्थानी पुढाकार घेऊन लोकोपोयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन,सुनील कोळी बळवंत

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आदर्श उपक्रमाची सध्या वाणवा होत असुन समाजातील सामाजिक व स्वंयसेवी संस्थानी पुढाकार घेऊन लोकोपोयोगी उपक्रम राबवावेत असे आवाहन
झरे गावचे रहिवासी व सेवानिवृत्त बॅंक अधिकारी सुनिल कोळी यांनी केले.

आई-वडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ पारंपारिक पद्धतीने कोळी परिवारा तर्फे ४०० एकफुटी गणेश मूर्तींचे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रशांत पाटील होते. यावेळी माजी सरपंच भारत मोरे, भारत घाडगे, ह भ प रामभाऊ कुदळे, महादेव पाटील, दिंडी प्रमुख बाळासाहेब कुलकर्णी, देविदास चौधरी, सोमनाथ जाधव, शिवाजी पिसाळ, तात्यासाहेब जाधव, संतोष गोसावी ,हनुमंत शिंदे, चैतन्य विराट, पोपट घाडगे आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी समस्त झरे ग्रामस्थांना ४०० गणपती देण्यात आले. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,
१९७२ पासून झरे येथे स्व.कोळी गुरूजी शाडूच्या गणेशमूर्ती बनवून प्रथम अल्पदरात पुन्हा मिळेल त्या दरात विक्री करत होते .लोकाकडे पैसे नसेल तर ते धान्याच्या मोबदल्यात देत असत.तेही नसेल तर चक्क मोफत गणपती वाटण्याचा उपक्रम कोळी परिवार दरवर्षी राबवत होते . कोळी परिवारातील जेष्ठ संकल्पना राबवणारे कोळी गुरूजी दापंत्याचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा वारसा सुनील कोळी परिवार पारंपारिक पद्धतीने राबवत आहेत.

संपूर्ण गावाला आता ते मोफत गणपती दरवर्षी देतात.एकाही कुटुंबाला गणपती बाहेरून विकत आणावा लागत नाही.त्यांनी आई-वडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ एक फूट उंचीच्या तब्बल ४०० सुबक गणेश मूर्ती चक्क मोफत दिल्या आहेत.गेले तीन वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत आहेत. झरे येथे हा मूर्ती वाटपाचा अनोखा सोहळा पार पडला.
२०१९ साली गुरुजींचे निधन झाले. या नंतर गुरूजींच्या अर्धांगिनी कै. इंदुमती कोळी यांनी गुरुजींचा मोफत गणेश मूर्ती देण्याचे सुरू ठेवले. नंतर २०२० मध्ये त्यांचेही निधन झाले. आपल्या आईवडीलांचा हा समाजसेवेचा वारसा त्यांचे सुपुत्र श्री. सुनील कोळी (बळवंत) यांनी पुढे चालवला. त्यातूनच हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे.

बॅंक ऑफ बडोदाच्या देशभरातील विविध शाखांमध्ये व्यवस्थापक पदावर काम केलेले श्री. सुनील बळवंत यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन समाजकार्यात स्वतःला झोकून दिले आहे. ते पुणे येथे स्थायिक असुन सुद्धा आईवडिलांच्या स्मृती जागवण्यासाठी ते झरे येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. मूर्ती वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान आगामी काळात वयोवृद्धांसाठी मोफत आरोग्य शिबीर भरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यापुढेही हा मूर्तीवाटप उपक्रम संपूर्ण तालुका भरात करण्याचा उपक्रम असून हा वारसा पुढे त्यांचे चिरंजीव पूढेही चालू ठेवणार असल्याचे श्री. कोळी यांनी सांगितले आहे.दरम्यान सुनील कोळी (बळवंत) यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.यावेळी सर्वांचे आभार सोमनाथ जाधव यांनी मानले.



