शहर

दामोदर पिलाजी पाटील ( भाई) समाजसेवेचा विडा उचललेले एक कर्मयोगी पुरुष

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत..भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.

पालघर जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ता राजकारणी पालकमंत्री नसताना देखील जिल्ह्यासाठी पालकाची भूमिका आपल्या समाजसेवेतून पार पाडणारा सामान्य जनतेचा पालन कर्ता आगरी समाजाचा वरिष्ठ नेता त्यांचे नाव आज पालघर जिल्ह्यात मोठ्या आदराने घेतली जाते ते नाव म्हणजे दामोदर पिलाजी पाटील.(उर्फ भाई ) यांचा जन्म 24 सप्टेंबर 1942 रोजी पालघर जिल्ह्यातील सफाळे टेंभीखोडावे गावात झाला. त्यांचा मूलगाव चिखलपाडा परंतु वास्तव्य असलेले गाव म्हणजे सफाळे जलसार त्यांचे वडील पिलाजी पाटील पेशा शिक्षक ते सफाळे भागात गुरुजी या नावाने प्रख्यात होते.

ते जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असताना त्यांनी टेंभीखोडावे, चिखलपाडा,केव, मनोर या भागात शिक्षकाची उत्कृष्ट भूमिका पार पाडून अनेक विद्यार्थी घडवले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून शिक्षकाच्या मुलाने म्हणजे दामोदर पिलाजी पाटील यांनी पालघर जिल्ह्यात सफाळे विटी लाईन भागातील विराथन बुद्रुक येथील चाफेवाडी गावात जिल्हा परिषदेची 1984 रोजी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या शाळेची स्थापना केली .

आज या शाळेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन डॉक्टर,पत्रकार, वकील, शिक्षक, उद्योजक तसेच अनेक शासकीय विभागांमध्ये कार्यरत आहेत. तसेच त्यांनी केळवा रोड येथे देखील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या शाळेची स्थापना केली आहे. या दोन्ही शाळा मेघराज शिक्षण संस्था संस्थापक दामोदर पाटील यांचा देखरेखी खाली चालत असून त्यांनी पालघर तालुक्यातील सफाळे येथे पहिले आयटीआय उभारून या आयटीआय मधून शिक्षण घेणाऱ्या कुशल तरुण कारागिरांना शासकीय विभागामध्ये आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. तर विरार येथे देखील त्यांनी होमिओपॅथिक आणि मेडिकल कॉलेजची स्थापना केली आहे.

या मेडिकल कॉलेजमध्ये गरीब घरातून शिक्षण घेतलेल्या सफाळे भागातील अनेक गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य डॉक्टरी शिक्षण दिल्यामुळे हे विद्यार्थी आज आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून डॉक्टर झालेत. दामोदर पिलाजी पाटील हे सामाजिक कार्यकर्ते गोर गरिबांचे कैवारी, पालनकर्ते नीतिमत्तेचे आणि सामाजिक जाणिवेचे भान ठेवून त्यांनी समाजासाठी सामाजिक कार्य करून राजकारणात देखील त्यांनी आपले नाव लौकिक केले आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात त्यांची आगळीवेगळी ओळख आहे.

दामोदर पिलाजी पाटील पालघर जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती होते. तसेच त्यांना प्रशासकीय कामाची सखोल माहिती असल्यामुळे त्यांनी पालघर जिल्ह्यात 1992 ते 1997 या कालावधीत अनेक रस्त्यांची कामे मंजूर करून ती मार्गी लावली आहेत. तसेच सातपाटी सफाळे एडवण सारख्या दुर्गम भागासाठी प्रशासनाकडून निधी मंजूर आणि उपलब्ध करून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली आहेत.

तसेच वाढीव या गावाला चारी बाजूंनी वैतरणा नदीने विळखा घातल्यामुळे समुद्राचे खारे पाणी या गावात शिरून सुपीक जमिनी खाऱ्या झाल्या होत्या म्हणून शासनाकडून 1600 कोटी रुपयांचा निधी मंजूर आणि उपलब्ध करून या जमिनीच्या संरक्षणासाठी त्यांनी खारलँड बंधारा बांधून दिला आहे. असा हा सामाजिक कार्यकर्ता त्यांचा 24 सप्टेंबर हा जन्मदिवस आहे.

25 सप्टेंबर 2023 रोजी ते 82 व्या वर्षात पदार्पण करत आहेत तरी देखील आजही ते त्यांनी उचललेल्या समाजसेवेचा विडा ते आजन्म करत राहतील आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजाचा विकासासाठी आणि गोरगरिबांच्या हितासाठी आजन्म कार्यरत राहुन या जन्माचे सार्थक समाज हित करून करतील अशी माहिती टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत यांना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button