महाराष्ट्र

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर कारखान्याची 56 वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न

विशेष प्रतिनिधी.. रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो नं 9921500780

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर कारखान्याची 56 वी वार्षिक सर्व साधारण सभा आज दि 22/09/2023 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार तथा श्री शंकर सहकारी चे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे आमदार राम सातपुते, शिवामृत दूध संघांचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, जि प माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, महर्षी कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने देशमुख, सूतगिरणीचे चेअरमन सुभेदार आप्पा काळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी चेअरमन रणजितदादांनी बोलताना सांगितले की, श्री शंकर सहकारी FRP पेक्षा 135 रु ज्यादा दर देणार असून दिवाळी मध्ये उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.तसेच कारखान्याच्या साखर प्रकल्पाच्या प्रस्तावित विस्तारीकरण कामाच्या भांडवली खर्चास मंजुरी घेण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

तसेच यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी सभेचे प्रास्ताविक केले, तर सभेचे विषय वाचन जनरल मॅनेजर रविराज जगताप यांनी केले व आभार संचालक दत्तात्रय रणवरे यांनी मानले.
यावेळी एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, कारखान्याचे सर्व संचालक, सभासद शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button