शहर

तलासरी झाई बोरीगाव ग्राम विस्तार अधिकारी व शिपाई 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.

पालघर जिल्ह्यातील तरासरी तालुक्यातील झाई बोरीगाव ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या प्लंबिंग कामाचे बिल पास करून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तिचा स्वीकार करणाऱ्या झाई बोरीगाव ग्राम विकास अधिकारी व शिपाई यां दोघांना गुरुवारी दुपारी अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्ष दयानंद गावडे यांच्या पथकाने रंगेहात अटक करून या दोघांविरुद्ध घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

66 वर्षीय तक्रारदार पुरुष यांनी तलासरी तालुक्यातील झााई बोरीगाव ग्रामपंचायत हद्दीत 2022 रोजी प्लंबिंगचे काम केले होते. या कामाचे बिल पास करून देण्यासाठी झाई बोरीगाव ग्राम विकास अधिकारी सुनील भागोजी पाटील वय वर्ष 53 अमित दिलीप दुबला वय वर्ष 35 हे दोघे 5000 रुपयांच्या पैशाची मागणी करत होते.
याबाबत तक्रारदार प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर यांनी या दोघांची तक्रार अँटी करप्शन ब्युरो कार्यालय पालघर विभागात केली होती .

या तक्रारीची पडताळणी पालघर कार्यालयामार्फत करून पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र व अप्पर पोलीस अधीक्षक सुनील घेरडीकर ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस हवालदार संजय सुतार, पोलीस हवालदार दीपक सुमाडा, पोलीस हवालदार नवनाथ भगत, पोलीस हवालदार योगेश धारणे, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, महिला पोलीस नाईक स्वाती तारवी, पोलीस शिपाई चालक जितेंद्र गवळी या पथकाने गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:50 वाजता सापळा रचून तक्रारदार (प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर )यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचा समक्ष रंगेहात अटक करून या दोघांविरुद्ध घोलवड पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी गुन्हे दाखल केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button