पुसेसावळी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अकलूज येथील समस्त मुस्लिम समाजाचे प्रांत कार्यालयाला निवेदन…

अकलूज प्रतिनिधी अमीर मोहोळकर मो.नं. :- 9890299499
पुसेसावली ता. कोरेगांव जि. सातारा येथे घडलेल्या घटनेची हकीकत अशी की सातारा शहर पोलीस ठाणेस दिनांक 15/ 8 /2023 रोजी गु.र. नंबर 648/ 2023 भा.द.स.कलम 595 अ. 153 ब. 504 प्रमाणे गुन्हा या इंस्टाग्राम अकाउंटवरुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने आक्षेपार्ह पोस्ट (इंस्टाग्राम स्टोरी) प्रसारित झाल्याबाबत नमूद केले होते. सदर गुन्ह्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखा (CIU. युनिट) सातारा यांचे पथकाने विधी संघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे nobixx_70 या इंस्टाग्राम अकाउंट बाबत तांत्रिक माहिती इन्स्टाग्राम यांच्याकडून प्राप्त करून घेतली. सदर माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर माहिती मधून अमर अर्जुन शिंदे राहणार मु. पो. हिवरे ता. कोरेगाव जि. सातारा याची माहिती निष्पन्न झाली आहे.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने संशयित अमर शिंदे यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता अमर शिंदे हा त्याचे इंस्टाग्राम अकाउंट वरून मैत्रिणी सोबत इंस्टाग्राम चॅटिंग करीत होता सदर मैत्रीण ही विधी संघर्ष बालक नामे अरमान राजासाहेब शेख याचे सोबत देखील इंस्टाग्राम वर संपर्कात होती त्याचा राग मनात धरून आरोपीने इंस्टाग्राम वर आरोही या महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून सदर अकाउंट वर विधी संघर्ष बालक नामे अरमान राजासाहब शेख याचे सोबत चॅटिंग करू लागला सदर अकाउंट वरून चॅटिंग करत असताना आरोपीने विधी संघर्ष बालक नामे अरमान राजासाहब शेख याचा विश्वास संपादन करून त्याचेकडून त्याचे nobixx_ 70 या इंस्टाग्राम अकाउंटचा आयडी व पासवर्ड प्राप्त करून घेतला त्यानंतर आरोपी नामे अमर शिंदे याने विधी संघर्ष बालक नामे आरमान राजासाहब शेख यास लोकांनी शिवीगाळ करावी. त्याची बदनामी व्हावी. त्यास शिक्षा मिळावी व तो त्याच्या मैत्रिणीपासून दूर व्हावा या हेतूने दिनांक 15/08/ 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने अक्षेपार्ह पोस्ट (इंस्टाग्राम स्टोरी) nobixx_70 या instagram अकाउंट वरुन प्रसारित केली.

सदर गुण्याचे तांत्रिक विश्लेषण करीत असताना विधी संघर्ष बालक नामे अरमान राजासाहब शेख याचे nobixx_ 70 या नावाचे इंस्टाग्राम अकाउंट हे आरोपी नामे अमर अर्जुन शिंदे राहणार मु. पो. हिवरे ता. कोरेगाव जि. सातारा हा वापरत असल्याबाबत माहिती इंस्टाग्राम व मोबाईल कंपनी यांनी दिलेली माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून प्राप्त झाले आहे.

याच आक्षेपार्ह पोस्ट च्या वादातून पुसेसावळी येथील जमावाने अल्पसंख्याक बांधवांची घरे,दुकाने, वाहने लक्ष्य करत तोडफोड,जाळपोळ केली होती.याचदरम्यान जमावाने प्रार्थना स्थळावर हल्ला करत त्याठिकाणी असणाऱ्या दहा जणांना मारहाण केली होती.या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नूरुलहसन शिकलगार (वय २७) यांचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात खून,शासकीय कामात अडथळा आणण्यासह एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.याप्रकरणी पोलिसांनी तपास करत दंगल,मृत्यूप्रकरणात २३ जणांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असून,त्यांच्या पथकाने तपासासाठी औंध पोलिसांच्या ताब्यातील 23 जणांना सातारा येथे आणले असता त्यांची रवानगी सातारा ठाहर॒ पोलिस ठाण्याच्या कोठडीत करण्यात आली असून,त्यांच्याकडे दंगलप्रकरणी मुख्य गुन्ह्याच्या अनुषंगाने स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या १६ जणांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना शनिवारी वडूज येथील न्यायालयात हजर करण्यात आले…
यामध्ये ज्योतीराम आनंदराव भाडुगळे,किशोर शाहाजी कदम,जयराम अशोक नागमल,किरण गोरख घार्गे,विजय बजरंग निंबाळकर,सोमनाथ बाबूराव पवार,महेश रामचंद्र कदम, विकास वसंत घार्गे,शिवाजी विनायक पवार,श्रीनाथ हणमंत कदम,दादासाहेब मारुती माळी,सागर संपत जाधव (सर्व रा. वडगाव जयराम स्वामी),अनिरुद्ध सतीडा देशमाने (रा. पुसेसावळी),नीलेश अनिल सावंत, सागर सिद्धनाथ सावंत, सुमित चंद्रकांत जाधव (सर्व रा. गोरेगाव वांगी) यांचा समावेश आहे…

या घटनेच्या निषेधार्थ समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या याच अनुषंगाने पुसेसावळी घटनेच्या निषेधार्थ अकलूज पंचक्रोशितील बहुसंख्य मुस्लिम समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध म्हणून पुसेसावळी ता. कोरेगांव येथील दंगेखोर समाज कंटकांवर निःपक्ष पणे चौकशी करून दोषींवर कारवाई करून या मागील मास्टरमाईंड कोन? याचा शोध घेण्यात यावा,या बाबत चे निवेदन उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) कार्यालयाला देण्यात आले.या वेळी अकलूज पंचक्रोशितील बहुसंख्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते…


निवेदन प्रत खालील प्रमाणे
प्रति,
मा.उपविभागीय अधिकारी,
माळशिरस विभाग,अकलूज
विषय : पुसेसावळी ता.कोरेगांव येथील दंगेखोर समाजकंटकांवर नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाईबाबत…
महोदय,
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी ता.कोरेगांव येथे झालेल्या दंगलीत मृत पावलेल्या मरहूम नुरूलहसन शिकलगर व इतर गंभीर प्रकृती असलेल्यांचे मारेकरी यांना तात्काळ अटक करण्यात यावी.सदरील घटना ही मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळ मशिदीत घडलेली आहे,हे अत्यंत निंदनिय आहे ? सरकारकडून घटनास्थळी भेट दिली गेली परंतु पीडीत कुटुंबीयांना आर्थिक मदत व उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देणे सध्याचे परिस्थिती पाहता आवश्यक होते.मात्र सर्व काही अलबेल चालल्याचे आव आणून अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर एकतर्फी अन्याय ही सरकारकडून केला जात आहे.या असंवेदनशील सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे…
पुसेसावळीत हिंदु-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने नांदत असताना काही विध्वंसक वृत्तीस सरकारकडून अभय दिला जातोय का ? अशी शंका मुस्लिम बांधवांना निर्माण झाली आहे.समाजमाध्यमात आक्षेपार्ह पोस्ट करणारा आरोपी हा अल्पसंख्याक मुस्लिम नसताना मुस्लिम बांधवाचा जीव घेणारे मोकट का ? मुस्लिम समाजाला दुय्यम वागणूक का ? त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करणे ही व्यर्थ आहे का ? हा आमचा सरकारला संतप्त सवाल आहे.सदरील घटनेतील आरोपींविरुद्ध निष्पक्ष पध्दतीने कारवाई करून यामागील मास्टर माइंडचा शोध घेण्यात यावा,अशी आम्ही मागणी करीत आहे…

मागण्या पुढीलप्रमाणे :
१) या घटनेमध्ये मृत (शहीद) पावलेले २ लोकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी.
२) या घटनेमध्ये जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तींना ५ लाख रुपयांची मदत जाहीर करावी.
३) घटनेमध्ये नुकसान झालेल्या लोकांचे घरे व दुकाने यांची सरकारने पुर्नवर्सन करून द्यावे; अशी मागणी करण्यात येत आहे.
सदरील घडलेल्या घटनेचा आम्ही अकलूज शहर मुस्लिम समाज बांधव तीव्र निषेध नोंदवत आहे.

कळावे,
आपले
सोबत – १) गुन्ह्यातील हकिकत जबाब प्रत
माहितीसाठी प्रत रवाना :
१) मा.राष्ट्रपती,भारत
२) मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,
३) मा.गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य,
४) मा.पोलीस महासंचालक,मुंबई,
५) मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र,
६) मा.जिल्हाधिकारी,सोलापूर
७) मा. पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण,
८) मा.उपविभागीय पोलीस अधिकारी,अकलुज…



