विक्रमगडनगरीत घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे जल्लोशात आगमण

विक्रमगड (प्रतिनिधी ): राजेंद्र भगवान भोईर (मो.९२०९८६९८३०)
देशात विदेशात आज लाडक्या बाप्पाचे जल्लोशात घरोघरी घरगुती व मोठमोठया गणेश मंडळाचे गणपती चे जल्लोशात आगमन झाले.गणपती बाप्पा मोरया’चा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने अधूनमधून दिलेली सलामी, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत आज गणरायाचे आगमन झाले. सोमवारी सायंकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाने रस्ते फुलून गेले होते.

भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम विक्रमगडनगरीत दिसून येत होता.बाप्पाच्या आगमनासाठी गेल्या आठ दिवसांपासूनच जय्यत तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची वाट पाहणाऱ्या सर्वच गणेशभक्तांनी अगदी पारंपारिक वेषात बाप्पाचे स्वागत केले. सर्वच गणेश मंडळांनी रात्रीपासूनच मिरवणुका काढून वाजतगाजत गणपती आणले.

सार्वजनिक मंडळांच्या मंडपांइतकाच उत्साह घराघरांमध्ये पाहायला मिळाला. घराघरांमध्ये प्राणप्रतिष्ठापनेची लगबग सुरू होती. आरती, स्तोत्र आणि मंत्रपठण असं मंगलदायक वातावरण प्रत्येक घरात पाहायला मिळाले. बाप्पा घरी येणार म्हणून बच्चे कंपनी आनंदानं हरखून गेली होती.



