महाराष्ट्र
देशातील टॉप टेन खासदारांमध्ये राज्यातील चौघांना स्थान राज्यातील सुप्रिया सुळे पहिल्या स्थानावर.

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 9921500780
लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे गेट वे पॉलिटिकल स्टँटेजिक संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार संसदेतील कामकाजात सक्रिय सहभाग असणाऱ्या पहिल्या दहा खासदारांमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे ,
बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्या तर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा दुसरा क्रमांक आहे. पहिल्यादा खासदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी एक, शिवसेना तीन, भाजप तीन, काँग्रेस एक, डी एम के दोन, हे खासदार पहिल्या दहा मध्ये आहेत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अग्रभागी आहे.



