क्रीडा

शिवराणा क्रिकेट क्लब खेड- हा संघ माळीनगर चषक 2023 चा मानकरी

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 9921500780

माळीनगर येथील गहिनीनाथ प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट डे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत शिवराणा क्रिकेट क्लब खेड या संघाने प्रथम क्रमांकाचे १००००० (एक लाख) रुपयाचे पारितोषिक पटकवले, द्वितीय पारितोषिक ५०,००० ज्ञान ज्योती क्रिकेट क्लब निमगाव (मगराचे), तृतीय पारितोषिक २५,००० S B क्रिकेट क्लब कवठेमहाकाळ, चौथे पारितोषिक २५,००० S.P SSK हे सर्व संघ विजयाचे मानकरी ठरले

याप्रसंगी दि ,सासवडा माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देण्यात आले. व्दितीय पारितोषिक निळकंठ रासकर यांच्या हस्ते देण्यात आले, मॅन ऑफ द टूर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज अक्षय बोडरे, उत्कृष्ट टूर्नामेंट गोलंदाज अभिजीत खराडे, उत्कृष्ट फलंदाज कपिल गरुड, उत्कृष्ट गोलंदाज श्रीकांत पाटील, १२ चेंडू ५० धावा दिगंबर माने, या सर्व खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पारितोषिक प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी अनेक मान्यवरांनी माळीनगर चषक 2023 प्रत्येक वर्षी भरण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली. याप्रसंगी दि सा माळी शुगर फॅक्टरी चेअरमन राजेंद्र गिरमे, निळकंठ रासकर, पृथ्वीराज भोंगळे, अभिजीत भोंगळे, प्रणव रासकर, आकाश राऊत, प्रणव एकतपुरे, महादेव बंडगर, अनिल नलवडे, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गहिनीनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल थोरात, उपाध्यक्ष संतोष बनसोडे, अरिफ कझी, सुहास कचरे, सलमान मुलाणी, विशाल आठवले, अनिस शेख, प्रदीप घाडगे, मोसिन शेख, यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. गहिनीनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी उपस्थित मान्यवर खेळाडू, संघ, सर्व उपस्थित क्रिकेट प्रेमी यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button