माहिती अधिकार कमकुवत करणाऱ्या डिजिटल पर्सनल डेटा विधेयकास खासदारांनी कडाडून विरोध करण्याची गरज.माहिती अधिकार कार्यकर्ता -जावेद बागवान

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . —- 97 30 867 448
माहिती अधिकार कार्यकर्ता जावेद बागवान यांनी माढा लोकसभेचे खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांना निवेदन देऊन डिजिटल पर्सनल डेटा विधेयका बाबत विरोध करून मागणी सादर केली आहे ती पुढील प्रमाणे मी जावेद युसुफ बागवान आपल्या लोकसभा मतदार संघातील मतदार आहे.मी जागरूक नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून शासन व प्रशासन पारदर्शक ठेवणे आणि सामान्य जनतेचे हित जपण्यासाठी निरंतर कार्यरत आहे. आमचे राजकीय,सामाजिक व कायदेशीर हित जपण्यासाठी भारताच्या संसदेत आम्ही तुम्हाला आमचे प्रतिनिधी म्हणून पाठवलेले आहे.त्यामुळे मी आपणास खालील मागणीचे विनंती पत्र पाठवित आहोत.
विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाने ५ जूलै २०२३ रोजी डिजीटल पर्सनल डेटा विधेयक २०२३ या विधेयकांस मंजूरी दिलेली असून सदर विधेयक चालू पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूरीसाठी मांडले जाणार असल्याचे सरकारने सूचीत केलेले आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ८ उपकलम (१)(ञ) नुसार परंतुकांत, जी माहिती संसदेला आणि विधीमंडळाला नाकारता येणार नाही ती माहिती अर्जदारास नागरिकांना नाकारता येणार नाही अशी जी भक्कम तरतूद करण्यात आलेली आहे.ही शक्तीशाली तरतूद काढून टाकण्याची अंगभूत व्यवस्था डिजीटल पर्सनल डेटा विधेयक २०२३ मध्ये करण्यात आलेली आहे.

म्हणजेच डिजीटल पर्सनल डेटा विधेयक २०२३ संसदेत मंजूर होऊन राष्ट्रपती ची सही झाली की माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ८(१) (ञ) /Section 8(1)(j) आपोआप खारीज होऊन माहिती अधिकार कायदा कमकूवत होणार आहे. असे होण्याला आपल्या मतदार संघातील जागरूक नागरिक म्हणून आमचा तीव्र विरोध आहे.तरी आपण सदर विधेयक संसदेत मंजूरीसाठी आल्यास त्याचा कडाडून विरोध करावा.व डिजीटल पर्सनल डेटा विधेयकांच्या विरोधात मतदान करावे. सामान्य माणसांला अधिकार व हक्क देणारा माहिती अधिकार कायदा शाबूत ठेवावा. अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे
नाव.-जावेद युसुफ बागवान
पद प्रचार समन्वयक माळशिरस तालूका –
पत्ता : शंकरराव मोहिते कॉलेज रोड बायपास कृष्णप्रिया नगर अकलुज.
” माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र”



