महाराष्ट्र

साखर उत्पादकांना अच्छे दिन, राज्यातील साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेद्वारे अर्थसाह्य

प्रतिनिधी…रियाज मुलाणी मो 9921500780

आर्थिक संकटात सापडलेल्या सहकार चळवळीतील साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. साखर कारखानदारांना काही अटी व शर्तींवर हे कर्ज उपलब्ध होणार असून, त्यातून सत्तेचे गाळप करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस असल्याचे बोलले जाते.

भाजपच्या ताब्यातील साखर कारखान्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थसाह्य देण्याच्या प्रश्नावरून नव्याने सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस खास करून वित्त व नियोजन विभागाचा कार्यभार सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिकूलता दर्शविली होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर अजित पवार यांना त्या मुद्यावर दोन पावले माघार घ्यावी लागली. आता विनासहकार नही उद्धार या न्यायाने सहकारी कारखानदारीत असलेल्या सत्ताधारी पक्षातील कारखानदारांना याद्वारे मदत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button