करमाळा तालुक्यातील भेडसावणाऱ्या चारा व पाणी टंचाई बाबत माजी आमदार नारायण पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीत उठविला आवाज

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
जेऊर सह 29 गावची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे व कुकडीचे एक आवर्तन सोडणे या चारा व पाणी टंचाई वरील चांगल्या उपाय योजना आहेत असे ठाम मत माजी आमदार नारायण पाटील यांनी आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की सद्या करमाळा तालुक्याच्या काही भागांवर पाणी व चारा टंचाई संकट दिसून येत आहे. वास्तविक पाहता यावर या अगोदरच पाऊस प्रमाण व लागवड क्षेत्र यांची आकडेवारी पाहून नियोजन करणे गरजेचं होते.
परंतु किमान आता तरी पूर्व भागातील 29 गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणुन जेऊर सह 29 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करणे गरजेचं आहे.यातील काही गावे पिण्याच्या पाण्यासाठी स्वावलंबी आहेत पण इतर गावांना याचा फायदा होईल.अनेक गावात जलजिवन योजनेची कामे सुरू आहेत पण यंदा यातील एकही योजना पूर्ण होऊन कार्यान्वित झाली नसल्याने पाण्याचे संकट कायम आहे. पोथरे परिसरातील अनेक गावे तसेच बोरगाव सह सात गावे या भागात पाणी टंचाई जाणवत आहे.
यामुळे कूकडीचे पाणी आवर्तन मिळाल्यास या भागातील चारा व पाणी टंचाई दूर होऊ शकते ही बाब आपण सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मांडली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर करमाळा मतदार संघातील संभाव्य चारा व पाणी टंचाई बाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदनातून केल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.
तसेच माजी आमदार पाटील यांच्या मागणी नंतर विद्यमान आमदार महोदयांनी चारा व पाणी टंचाई आढावा बैठकीचा फार्स केला व इतक्या महत्वाच्या विषयावर वीस पंचवीस मिनिटे चर्चा करून संकटग्रस्त शेतकरी, गोपालक आणि सामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा गंभीर आरोप तळेकर यांनी केला



