निंभोरे व घोटी येथील शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल लक्ष देण्याची ग्रामस्थाची मागणी

करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख मोबाईल 98 50 68 63 60

करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील शालेय विद्यार्थ्यांचे जेऊर येथे शिक्षणासाठी जाताना प्रचंड मनस्ताप व हालअपेष्टा सोसाव्या लागतात याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी निंभोरे येथील ग्रामस्थ राज पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले

याबाबत अधिक माहिती देताना पठाण पुढे बोलताना म्हणाले की सध्या निंबोरे गावातून जेऊर येथे शालेय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात जेऊर येथून निंभोरे येथे जाताना शालेय विद्यार्थ्यांना कधीही वेळेवर एसटी बसेस नसतात एसटी बसेस असल्या तरी त्या बसेस कधीही वेळेवर येत नाही

कधी कधी शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करून शिक्षण घ्यावे लागते तसेच ना दुरुस्त बस अशी खंत श्री पठाण यांनी बोलताना व्यक्त केली याकडे वेळीच करमाळा एसटी आगाराने लक्ष देऊन शालेय विद्यार्थ्यांचे होणारे प्रचंड हाल थांबवावे अशी मागणी पठाण यांनी बोलताना व्यक्त केली



