शहर

शहापूर जिल्ह्यातील तलाठी आणि खाजगी इसम यांनी केली 8 लाख रुपयांच्या लाचेची मागणी.. खाजगी इसम रंगेहात अटक तलाठी फरार… पालघर पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांच्या पथकांची कारवाई

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640

जमिनीचे फेरफार मंजूर करून सातबारा मध्ये जागा मालकाचे नाव नोंदविण्यासाठी 8 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून 8 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शहापूर जिल्ह्यातील वेहरोली बुद्रुक तलाठी यांचा कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी इसमाला पालघर अँटी करप्शन ब्युरो पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांच्या पथकाने रंगे हात अटक करून तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे याचा ठाणे किन्हवली पोलीस कसून शोध घेत आहेत.
शहापूर जिल्ह्यातील तक्रारदार काम करत असलेल्या त्यांच्या मालकांनी शहापूर येथे सर्वे नंबर ( 267 बी) शेणवे गावात जमीन खरेदी केली आहे.

या जमिनीचे फेरफार मंजूर करून सातबारा मध्ये नाव नोंदवण्यासाठी या जमीन खरेदी केलेल्या मालकांनी शहापूर जिल्ह्यातील तलाठी सजा वेहरोली बुद्रुक यांच्या कार्यालयात 10 महिन्यापूर्वी अर्ज केला होता.या अर्जामध्ये त्रुटी न काढता जमिनीच्या फेरफार यामध्ये नाव नोंदवण्यासाठी वेहरोली बुद्रुक सजा तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे यांनी त्यांच्या कार्यालयात काम करणारे खाजगी इसम अशोक दत्तात्रेय वरकुटे यांच्या मार्फत या जमीन मालकाकडे 8 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत या दोघांविरुद्ध 16 ऑक्टोंबर 2024 रोजी अँटीकरप्शन ठाणे कार्यालयामध्ये लिखित तक्रार करण्यात आली होती.या तक्रारीची पडताळणी करून लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर संदीप दिवाण अप्पर पोलीस आयुक्त अतिरिक्त कारभार अँटी करप्शन ब्युरो ठाणे परीक्षेत्र, गजानन राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र, महेश तरडे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो पालघर युनिट पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी यांच्या पथकाने 17 ऑक्टोबर 2024 रोजी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे यांच्या सांगण्यावरून त्यांचा खाजगी इसम. अशोक दत्तात्रेय वरकुटे (वय वर्ष 62) यांनी 8 लाख रुपयांची लाच यामध्ये 2 लाख रुपयांच्या भारतीय चलनी नोटा व इतर सहा लाख रुपये डुप्लिकेट नोटा पंचा समक्ष स्वीकारल्या म्हणून त्याला रंगेहात अटक करून त्याच्या विरुद्ध ठाणे किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे यांचा किन्हवली पोलीस कसून शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button