क्रीडा

स.मा.वी.च्या विद्यार्थ्यांनी जिंकली माळीनगर येथे शालेय व्हाॅलीबाॅल स्पर्धा

अकलूज प्रतिनिधी तात्या साहेब काटकर

माळीनगर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांच्या वतीने शालेय व्हाॅलीबाॅल क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धा १९ वर्षांखालील मुले व मुली व १४ वर्ष मुली अशी खेळवण्यात आली. माळशिरस तालुक्यातील एकूण ३४ शाळेच्या संघांनी भाग घेतला होता. मानवाचे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात. बुद्धी बरोबर शारीरिक कौशल्य दाखवणारा हा खेळ.स्पर्धात्मक खेळाडूंना अनेक मूलभूत कौशल्ये पार पाडणे आवश्यक असते.

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाने तीनही स्पर्धेत सहभाग घेतला त्यामध्ये 19 वर्ष मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक, तसेच 19 वर्ष मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक व 14 वर्ष मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला या तिन्ही संघाची निवड तालुकास्तरावरून जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता झाली आहे.

या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन व सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी केले. तसेच मार्गदर्शक शिक्षक भिमाशंकर पाटील, संजय राऊत, उमेश भिंगे, तानाजी शिंदे, दुधाळ सर याचेही अभिनंदन केले. उप मुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे व विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button