महाराष्ट्र

जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क तर केम ला कन्याकुमारी थांबणार.माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत थांबा सुरू करण्याचा संपन्न झाला शुभारंभ

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

मध्य रेल्वेच्या जेऊर व केम रेल्वे स्थानकावर आणखी दोन एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला आहे. यामुळे प्रशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून हे थांबे मिळाले आहेत. करमाळा तालुक्यातील केम, जेऊर येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांचे अनेक दिवसांपासून होते या मागणीसाठी प्रवाशांचे आंदोलने ही झाली होती.

याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा पाठपुरावा केल्याने या रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे. जेऊर रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्सप्रेस या गाडीला तर तर केम रेल्वे स्थानकावर कन्याकुमारी एक्सप्रेस या रेल्वे गाडीला थांबा मिळाला आहे. या दोन्ही गाड्यांना हिरवा झेंडा खासदार निंबाळकर यांनी या कार्यक्रमात दाखविला हा कार्यक्रम केम व जेऊर येथे पार पडला. करमाळा तालुक्यातील जेऊर ही करमाळ्याची राजधानी मानली जाते.जेऊर या ठिकाणी जवळच्या 30 ते 40 आसपास गावातील प्रवासी जेऊरला येत असतात.

त्यामुळे भुवनेश्वर मुंबई कोणार्क एक्सप्रेस या गाडीला थांबा मिळण्यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात आला व हा प्रयत्न शेवटी खासदार निंबाळकर यांच्यामुळे यशस्वी झाला व जेऊरला थांबा मिळाला. यावेळी प्रमुख पाहुणे मन्हून करमाळा माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, रेल्वे अधिकारी अतिरिक्‍त मंडल रेल्वे प्रबंधक शैलेन्द्र सिंह परिहार उपस्थित होते. याप्रसंगी खासदार निंबाळकर यांनी जेऊर साठी हुतात्मा एक्सप्रेस ला पण थांबा लवकरच मिळेल.अशे आपल्या मनोगतात सांगितले कोणार्क चे टू वे करण्यासाठी आश्वासन, हुतात्मा चा प्रस्ताव रेल्वे बोर्डा कडे लवकरच मंजूरी हा शब्द मिळावा, फ्लॅटफॉर्म नंबर 1/एक वर तिकीट मिळण्यासाठी लवकर सुविधा, दौंड डेमो सकाळी या साठी प्रयत्न, हैदराबाद चे स्लीपर कोच वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आपल्या मनोगत अशी आश्वासने खासदार निंबाळकर यांनी दिली आहेत.

यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्टेज वरती उपस्थित यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक एल. के. रणयेवले, सहायक वाणिज्य प्रबंधक सुदर्शन देशपांडे, अतुल पाटील सभापती करमाळा तालुका,गणेश चिवटे भाजप ता. अध्यक्ष,पृथ्वीराज पाटील, शंभूराजे जगताप, महेश चिवटे बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख, जगदीशजी अगरवाल,भाजप शहर अध्यक्ष दीपकजी चव्हान भाजप अध्यक्ष , प्रवासी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, जयसिंग ढवळे भाजप टेंभुर्णी, इ.स्टेजवर उपस्थित होते. यावेळी प्रशासनही सकारात्मक होते. डॉक्टर सुभाष सुराणा, सुहास सूर्यवंशी करमाळा तालुका प्रवासी संघटना अध्यक्ष, प्रवीण करे, रमिज शेख, यांचे फार योगदान लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button