करमाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी युवासेनेकडुन रास्तारोको चा इशारा!

करमाळा प्रतिनीधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून चारा छावणी, चारा डेपो पाण्याचे टॅंकर सुरु करा या मागणी साठी करमाळा तालुका युवासेनच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेले निवेदन तहसीलदार नायब तहसीलदार गायकवाड यांनी स्विकारले
या वेळेस शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, शिवसेना विधान सभा संघटक संजय शिंदे युवासेना तालुका समन्वयक कुमार माने , शिवसेना उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, युवासेना तालुका चिटणीस पांडुरंग ढाणे, उपशहरप्रमुख बंटी राक्षे ,दिपक राखुंडे, पंकज परदेशी ,नंदकिशोर नलवडे लक्ष्मीकांत नलवडे ,सुनिल जगदाळे ,आदी उपस्थित होते.
युवासेनेकडुन देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सप्टेंबर महिना तोंडावर आला तरी करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे अनेक गावात तसेच वाडी वस्तीवरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून पेरलेले लाखो रुपयांचे बियाणे पाऊस नसल्याने वाया गेले आहे. खरीप हंगाम वाया गेला असल्याने शेतकऱ्यांचे अर्थिक चक्र कोलमडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच विमा योजनेत शेतकऱ्यांचा सरसकट समावेश करावा.
चाऱ्याची तिव्र टंचाई निर्माण झाली असून पशूपालक तसेच मेंढपाळा शेतकरी हवालदिल झालेला आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची सरकार कडे शिफारस करावी, तसेच गरज असेल तिथे पाण्याचे टँकर, चारा छावणी ,चारा डेपो उभारणी या बाबत सरकार कडे योग्य तो पाठपुरावा करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदना बाबत प्रशासनाकडून केलेल्या उपाययोजनांची माहिती आम्हाला आठ दिवसात लेखी स्वरूपात मिळावी अन्यथा प्रशासनाच्या उदासीन कारभारा बाबत कमलाभवनी देवीचा रोड येथील बायपास रोडवर मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी शेतकरी, जनावरांसह रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा युवासेनेकडुन देण्यात आला



