केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील खार्डी रेती बंदरावर महसूल विभागाची धाड टाकून कारवाई..

टाईम्स नाईन न्यूज नेटवर्क उपसंपादक विजय घरत
भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील खार्डी रेती बंदरावर शनिवारी रात्री पालघर महसूल विभागाने धाड टाकून अवैध रित्या रेतीचा उपसा आणि वाहतूक करणारे चार पिकअप गाड्या ताब्यात घेऊन चार जणांवर कारवाई केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अवैद्य रेती उपसा आणि वाहतूक यावर शासनाने बंदी लागू केले असताना देखील पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील खार्डी गावातील रेती बंदरातून राजरोजपणे गेल्या 1 वर्षापासून रेती उपसा करून तिची अवैद्य रित्या वाहतूक करून विक्री केली जात होती

याबाबत पालघर महसूल विभाग यांना गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावर महसूल विभागाच्या पथकाने शनिवार दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी खार्डी रेती बंदरावर धाड टाकून या बंदरातून अवैधरित्या रेती उपसा आणि वाहतूक करणारे चार पिकअप गाड्या ताब्यात घेऊन चार जणांविरुद्ध महसूल विभागाने कारवाई केली आहे. हे सर्व रेतीने भरलेले पिकअप सध्या केळवा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.



