महाराष्ट्र

कोणार्क एक्सप्रेसचे आज जेऊर रेल्वे स्थानकावर होणार संध्याकाळी सात वाजता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन

जेऊर प्रतिनिधी अलीम शेख

दिनांक 27 ऑगस्ट- 2023 (रविवारी) रोजी गाडी क्र. 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क रेल्वे एक्सप्रेसचे जेऊर स्थानकावर सायंकाळी सात वाजता मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रेल्वे अधिकारी स्वागत करणार आहेत अशी माहिती जेऊर येथील रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी यांनी दिली

.जेऊर येथे कोणार्क एक्सप्रेस थांबविण्यात यावी यासाठी ग्रामस्थ, रेल्वे प्रवासी संघटना, व्यापारी संघटना, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता अखेर सदर मागणीला यश आले असून उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता कोणार्क एक्सप्रेस चे उद्घाटन खासदार निंबाळकर यांच्या हस्ते होणार असल्याचे श्री सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले सदरच्या कार्यक्रमाला जेऊर तसेच परिसरातील प्रवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रेल्वे विभागाने केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button