लोकनेते कै .पै. मारुतीनाना मनोहर घोडके यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त वाफेगाव मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन.

प्रतिनिधी… रियाज मुलाणी मो.९९२१५००७८०
वाफेगाव नगरीचे सुपुत्र लोकनेते कै. पै . मारुतीनाना मनोहर घोडके यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते मारुतीनाना यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी गावातील नागरिकांनी ८२ बॅग रक्तदान करून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्याचे काम केले नानांनी आपल्या कारकिर्दीमध्ये गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणे, गावामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती साजरा करणे, ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवणे, मोहिते पाटील परिवाराशी एकनिष्ठ राहून २०टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण करणाऱ्या नानांना त्यांच्या केलेल्या कार्याचा विसर पडू नये म्हणून

ग्रामस्थांनी स्वखर्चातून त्यांचे भव्य असे स्मारक वाफेगाव नगरीमध्ये उभे केले आहे. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आजी माजी सरपंच, चेअरमन, पदाधिकारी, शिक्षक, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




