मुंबईत दूषित पाण्याचा पुरवठा बंद करावा… माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांची मुंबई बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी.

टाईम्स नाईन न्यूज मराठी नेटवर्क प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.
मुंबईतील विविध भागात गेल्या अनेक दिवसापासून पिण्यासाठी वापरण्यात येणारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत पुरवले जाणारे पिण्याचे पाणी दूषित स्वरूपात येत आहे.या दूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे पोट बिघडणे उलट्या होणे असे आजार होऊन नागरिकांना त्रास होण्यास सुरुवात झाली आहे.

दूषित पाणी येत असल्या कारणामुळे कांदिवली चारकोप बोरिवली गोराई जोगेश्वरी भागातील लोकांना पिण्याचे पाणी पैसे मोजून विकत आणावे लागत आहे. याबाबत या नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयामध्ये संपर्क साधून याबाबत 15 ते 20 दिवसाआधी तक्रार दाखल केली होती. तरी देखील या हा नागरिकांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असमर्थ ठरले आहेत.
मुंबईतील बोरिवली येथील एच एम बी कॉलनी बोरवली गोराई 2 येथील आर एस सी 23,17/27,37,30,19 आणि 50 येथे सिव्हरेज लाईन मुळे या भागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेट दिली असून या समस्या लवकरात लवकर सोडवावे असे नागरिकांच्या वतीने निवेदन केले आहे.



