संपादकीय

जर नोकरी मिळत नसेल तर स्वता मधील कौशल्ये विकसित करून नोकऱ्या देणारे बना.—
चंद्रशेखर गायकवाड .

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

मनुष्याने स्वताच्या क्षमता ओळखून मी यशस्वी होऊ शकतो.जिद्द चिकाटी धडपडीतून सळसळत्या रक्ताने स्वतात उर्जा चैतन्य निर्माण करून
यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी तुमच्या स्वप्नांना कृतीची जोड देऊन पहिल पाऊल टाकल पाहिजे.टाकलेल पहिल पाऊल हजारो मैलांची सुरूवात आहे.

टाकलेल पहिल पाऊल कधीच मागे घेऊ नका.हाती घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी मनात प्रखर आत्मविश्वास निर्माण करा.

नकारात्मक विचार आणि नकारातूमक माणसां पासून दूर रहा कारण त्यांच्या नकारात्मकतेचा प्रभाव पडून नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्या मनात आल्यास
काम करण्याची क्षमतेवर अनिष्ट परिणाम होत असतो.

प्रत्येक दिवस स्वताला घडवित रहा.दूरदृष्टी ,महत्वाकांक्षा निर्माण करा.भविष्यकाळाचा वेध घेताता भूतकाळाचे विस्मरण होऊ नये.

डिसिजन पाँवर (निर्णय ही एक शक्ती आहे)त्या शक्तीवर विश्वास ठेवा.एखादा निर्णय यदाकदाचित चुकीचा ठरेल परंतु निर्णयामुळे मनुष्य क्रियाशील राहतो.

उदा- तुम्हांला पोहण्याच्या स्पर्धेत विजेता व्हायचे आहे तुम्ही सराव करता ,कष्ट घेता विजेता ठरत नाही परंतु पोहण्यामुळे शारीरिक शक्ती वाढलेली असते. आत्मविश्वास वाढलेला असतो.रोग प्रतिकार शक्ती सुध्दा वाढलेली असते.हे सर्व निर्णय घेऊन यशाच्या दिशेने झोकून दिल्यामुळे शक्य आहे मात्र टिव्ही पुढे बसून राहणारे फक्त बसूनच राहतात.

भांडवल आर्थिक बळ ,मनुष्यबळ तुमच्याकडे नसेल परंतु हरकत नाही तुमच्या मनातील जिद्दीचा सुर्य कधीही मावळू देऊ नका.अडचणी आल्या तर त्यावर मात करा,

एडीसन बहिरा होता.हजारो वेळा प्रयोग करताना जग निगेटिव्ह बोलत होते पण जगाच ऐकून घेण्यास श्रवणयंत्रणा कमकुवत असल्यामुळं ते एडीसन यांना वरदान ठरले.

रामेश्वरमध्ये नावाड्याचा मुलगा सायकल वरून पेपर टाकत शिकत राहीला तेच राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणून उदयास आले.अग्नी ,आकाश ,नाग,पृथ्वी ,त्रिशुल क्षेपणास्र्त बनवून भारतभूभीलाअवकाश विज्ञानात
सामर्थ्यशाली बनविले.

कलामांना वैमानिक बनायचे होते वैमानिकाची परीक्षेत ते अयशस्वी झाले पण एक दिवस तेच कलाम तिन्ही सेना दलाचे प्रमुख बनले.

नोकऱ्या मिळाल्या नाही म्हणून नाराज होऊच नका.नोकऱ्या देणारे उद्योजक बना.व्यावसायिक बना.
स्वताची कौशल्ये विकसित करा.
(skill development )

निर्णय एक शक्ती.
लेखक चंद्रशेखर गायकवाड )
आगामी २४ वे पुस्तक .
मे 2023 प्रकाशित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button