शहर

गोरगरिब रुग्णांना अल्प दरात उपचार उपलब्ध करावा या मागणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांना माळशिरस तालुका शिवसेना (ठाकरे) च्या वतीने निवेदन

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448

80%समाजकारण आणि 20%राजकारण,
या शिवसेनेच्या उक्ती नुसार समाजाला जिथे गरज असेल तिथे शिवसेना तत्पर असते.आज प्रत्येक घरात एखादि तरी व्यक्ती आजारी असतेच,त्यामुळे दवाखान्याचा प्रत्येकाचा कधीतरी संबंध येतच असतो,पुर्वी वैद्यकीय सेवा कमी पैशात आणि योग्य प्रकारे दिलीजायची,
डॉक्टर सेवा रुपात रुग्नावरती उपचार करायचे,आज मात्र याचे व्यवसायात रुपांतर झालेले आहे,रुग्नसेवा हि ईश्वर सेवा हे ब्रिद कधीच कालबाह्य झालेले आहे.कोरोना काळात अनेकांनी आपला जीव गमावला आहे,

कित्येकांनी आपला घरातला कर्ता माणुस गमावला,आणि याच काळात समाजानेही गमावली ती माणुसकी, होय माणुसकी,दवाखान्यात उपचारासाठी जाणारा व्यक्ती आपल्या कुटुंबापासून दुर राहुनच उपचार घ्यायचा,मात्र त्याच्या उपचारासाठी होणारा खर्च मात्र त्याच्या नातेवाईकांना करावा लागायचा,काय उपचार चालु आहेत हे सगळं गुलदस्त्यात असायचं,कारण संकट मोठ्ठं होतं,…..कोरोना…. ,

कोरोना काळात उपचारासाठी कलेले कर्ज आजतागायत कितीतरी कुटुंब फेडत आहेत आणि डॉक्टरांनी मात्र या कालावधीत जमिनी खरेदी करुन तेथे फार्म हाऊस बांधलेत,आपल्या कुटुंबासमवेत विदेश यात्रा करत आहेत, रेमडीसिवर सारख्या इंजेक्शन चा तुडवडा निर्माण करुन डॉक्टरांसह त्यांच्या बगलबच्च्यांनी आणि मेडिकल वाल्यानी जी लुट केली ते तर आपल्याला आठवतच असेल.याला काही डॉक्टर अपवादही असतील,पण आजही दवाखान्यात गोरगरीबांना उपचारासाठी जायचं म्हणजे जिकीरीचंच आहे,म्हनुन बाहेरच्या गोळ्या औषधांचा वापर करुन अंगावर आजार काढायचा आणि दवाखाना टाळायचा,कारण त्याची ऐपत नसते दवाखान्याचे,मेडिकल चे,रक्त तपासणी लॅब चे वगैरे बिल भरन्याचे,एक तिळ सात जनांनी खाल्लं होता,या म्हणी प्रमाणे एक पेशंट सगळे (दवाखाना,मेडिकल, लॅब, सोनोग्राफी व इतर तपासणी केंद्रे.)मिळून कापतात.

रुग्नाची परस्थिती कशीही असो याच्याशी दवाखान्याचे काहिही देणे घेणे नसते,पंचतारांकीत जीवन जगन्यासाठी, शिक्षणासाठी गेलेला पैसा वसुलन्यासाठी माणुसकी बासनात गुंडाळून ठेवून पैसे कमविणे हा एकमेव अजेंडा काही डॉक्टर राबवत आहेत,त्यावर अंकुश लावण्यासाठी, गोरगरीबांना योग्य मोबदल्या उपचार उपलब्ध होन्यासाठी पहिले पाऊल म्हनुन सोलापुर जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. पाटील साहेब यांना सविस्तर चर्चा करुन,या विषयावर आळा बसविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुका यांचे वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माळशिरस तालुका प्रमुख संतोष(भैय्या)राऊत,माळशिरस तालुका उपप्रमुख महादेव बंडगर, शिवसेना अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे,शहर उपप्रमुख अमर खंडागळे व शिवसैनिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button