जेऊर येथील हँडबॉल स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणादायी,- भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
जेऊर येथील हँडबॉल स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणादायी ठरणार असून अशा विविध वयोगटातील स्पर्धा आयोजित करण्याची संधी राज्य हँडबॉल असोसिशनकडून वारंवार नूतन करमाळा हँडबॉल असोसिएशन यांना द्यावी असे प्रतिपादन भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
कर्मयोगी गोविंद (बापु) पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ४३ वी १९ वर्ष (मुले) महाराष्ट्र राज्य हँडबॉल अजिंक्यपद या स्पर्धेचे उद्घाटन धैर्यशील मोहिते पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी डबल उपमहाराष्ट् केसरी सभापती अतुल पाटील,जी. प. सदस्या सौ सवितादेवी राजेभोसले, आदिनाथ माजी संचालक धुळा कोकरे,सरपंच पृथ्वीराज पाटील,हँडबॉल असोसिएशनचे राज्याचे सचिव राजाराम राऊत, राज्य सहसचिव रुपेश मोरे, हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे डॉ आनंद चव्हाण ,भारत शिक्षण प्रसारक मंडळ सचिव प्रा अर्जुन सरक, मल्लखांब असोसिएशन राज्य सचिव पांडुरंग वाघमारे,सर्व ग्रामपंचायत सदस्य यश अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख संयोजन व राज्य स्तरीय पांच विनोद गरड यांनी केले. नूतन करमाळा हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष नुस्ते, विनोद गरड (सचिव),नौशाद जहागिरदार दत्तात्रय वाघमोडे (सहसचिव),यशवंत कुदळे ,रेहान तांबोळी,रोहन मुटेकर, सागर जाधव,निलेश सातव,अकिब पठाण,वैभव वाघमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन अंगद पठाडे यांनी केले तर आभार संतोष नुस्ते यांनी मानले. या स्पर्धेत २५ जिल्ह्यातील संघ सहभागी झाले आहेत. तर राज्य असोसिएशन कडून पंधरा पंचांची नेमणूक संपूर्ण स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.भारत क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर ही स्पर्धा सुरु झाली आहे.



