महाराष्ट्र
ॲड रचना होनमाने यांचा अण्णासाहेब शिंदे यांनी केला सन्मान.

माळीनगर प्रतिनिधी…. रियाज -मुलाणी मो.
9921500780
मौजे माळीनगर येथील ॲड रचना होनमाने यांनी लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एमपीएससी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादित केल्याने त्यांची सहाय्यक सरकारी अभयोक्ता( PUBLIC PROSECUTOR) वर्ग – अ CLASS -1 अधिकारी पदी निवड झाल्याने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, यांनी ॲड रचना होनमाने यांचा शाल, व पुष्पगुच्छ, देऊन सन्मान केला.

याप्रसंगी माळीनगर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच- संग्राम भोसले, सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष चंद्रकांत काळे, नितीन तुर्कोंडोनी, आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



