शहर

केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील 65 वर्षीय इसमाचा अपघात करून कार चालक आरोपी फरार.

जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील भरणेपाडा येथील आपल्या मुलीला आणण्यासाठी पायी रस्ताने चालत जाणाऱ्या एका 65 वर्षीय इसमाचा अपघात करून फरार झालेल्या मोटर कार वाहन चालकाविरुद्ध केळवा सागरी पोलिसांनी केळवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून केळवा सागरी पोलीस या आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

भरणेपाडा येथे राहणारे बबन दादू किणी वय वर्ष 65 हे 31 जुलै 2023 रोजी रात्री आठच्या सुमारास भरणेपाडा रस्त्यावरून आपल्या मुलीला आणण्यासाठी पायी चालत जात असताना पालघर दिशेने सफाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मोटर कारणे बबन किणी यांना मागून ठोकर देऊन त्यांच्या पायावरून गाडी नेल्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी होऊन त्यांच्या डोक्याला जबरी मार लागून 22 टाके पडले आहेत.

याबाबत केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी अज्ञात इसमाविरुद्ध केळवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून घटनास्थळी या पांढऱ्या मोटर कारची अर्धवट तुटलेली 7556 असा क्रमांक असलेले नंबर प्लेट केळवा सागरी पोलिसांच्या हाती सापडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button