शहर

स्वातंत्र्यदिनी ग्रुप ग्रामपंचायत मांडे-विठ्ठलवाडी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमेकडे असलेल्या ग्रुप
ग्रामपंचायत मांडे-विठ्ठलवाडी येथे स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर शासनाच्या आदेशानुसार मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत ग्रुप ग्रामपंचायत मांडे-विठ्ठलवाडी येथे शीला फलकाचे अनावरण विद्यमान सरपंच महेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत तर्फे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तर ग्रामपंचायत परिक्षेत्रातून इयत्ता दहावी , बारावी, डिप्लोमा, डिग्री संपादन करून उज्वल यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट चषक देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यमान सरपंच महेंद्र पाटील यांनी संपूर्ण ग्रामपंचायत मधून इयत्ता १० मध्ये ९५.८०% गुण मिळवून प्रथम आलेल्या जिया अभिजीत पाटील मांडे व परिस्थितीवर मात करत कोणतीही शिकवणी न लावता ९२% गुण संपादन करणाऱ्या हार्दिका विलास किणी विठ्ठलवाडी यांचे विशेष कौतुक केले.

त्याचबरोबर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ते म्हणाले की आपल्या उत्तम यशाचा गुणगौरव हा या लहान बालकांसाठी प्रेरणा असून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी नवी ऊर्जा देणारा आहे. यावेळी बहुजन विकास आघाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते कामनिष संजय राऊत, पोलीस पाटील राजेश पाटील, ग्रामसेविका प्रतीक्षा पाटील, उपसरपंच हर्षल भोईर, ग्रामपंचायत सदस्य निलेश भोणे, किशोर गिराणे, श्रीधर म्हात्रे, कल्पिता शेलार, प्रणाली भोपी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या, महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अनेक बालकांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा सावे मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button