महाराष्ट्र

ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर व बारामती हॉस्पिटल बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिरात १५४ जणांची तपासणी

इंदापूर प्रतिनिधी एस. ‌‌‌‌‌बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081247

ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर व बारामती हॉस्पिटल बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १५४ सभासदांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व दीप प्रज्वलन तसेच प्रमोद भंडारी यांच्या गायनाने करण्यात आली. बारामती हॉस्पिटलचे डॉ राजीव खरे, इंदापूर शहरातील डॉ समीर मगर, डॉ गीता मगर मॅडम, डॉ स्वाती ठोंबरे यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब घाडगे यांनी केला.

संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हॉस्पिटल डॉक्टर टीम यांचे मनापासून आभार मानले. डॉ मगर मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी सर्वांच्या डोळ्याचे तपासणी केली. तपासणी सोबत सर्वांना मोफत औषध उपचार केला.

संघाचे अध्यक्ष बाबासाहेब घाडगे यांनी आपल्या संघाबद्दल माहिती दिली व आत्तापर्यंत केलेल्या कामाची रूपरेषा सांगितली.

बारामती हॉस्पिटल नितीन सोनवणे व निलेश पवार व त्यांची टीमचे पूर्ण सहकार्य लाभले. अंकुश ढूके यांचे ही सहकार्य लाभले.

कार्यक्रमास उपाध्यक्ष भानदास पवार, पांडुरंग जगताप, बबन क्षीरसागर, संभाजी व्यवहारे, सौ छाया जाधव, कृष्णा हब्बू, जावेद यांची उपस्थिती होती.आभार प्रदर्शन सुभाष महाजन सर यांनी तर सूत्रसंचालन प्रमोद भंडारी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button