माळशिरस येथे स्वाभिमान लोकसंचलित साधन केंद्राच्या सर्वसाधारण सभेत बक्षीस वितरण संपन्न

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर, महाराष्ट्र राज्य व ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत स्वाभिमान लोकसंचलित साधन केंद्र माळशिरस यांच्या 6 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभे मध्ये उत्कृष्ट बचत गटांना बक्षीस वितरण माजी सभापती वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी वरील मान्यवरांच्या हस्ते ज्योती क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्या सुनंदाताई फुले, माळशिरस नगरपंचायत नगरसेविका ताई वावरे, सहाय्यक जिल्हा समन्वयक सतीश भारती, जिल्हा उपजीविका सल्लागार राजकुमार पवार , तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजित शेंडे ,

बँक ऑफ इंडिया चे समाधान कुंभार , तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव , प्रभाग समन्वयक सेंद्रिय शेती गौरी गावडे मॅडम, व्यवस्थापक विकास आगाम, लेखापाल उदय केमकर, स्वाभिमान लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा- सुरक्षा वाघमोडे, सचिव –सारिका जावीर, साधन केंद्राच्या सर्व कार्यकारी सदस्या, बचत गटांच्या महिला बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या प्रसंगी वैष्णवी देवी मोहिते पाटील बोलताना म्हणाल्या कि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून बचत गटाच्या महिलांना विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.



