शहर

सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणे पडले महागात–आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे चांगलेच भोवले आहे नाशिक महापालिका आयुक्तांवर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

नाशिक आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकारणात ही दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरु होती. 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते.

महापालिका आयुक्त यांना धमाकवने आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदर बच्चू कडू यांच्यावर होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button