महाळूंग नगरपंचायत मध्ये दबावाचे व स्वार्थाचे राजकारण – तालुका शिवसेना-प्रमुख— संतोष राऊत

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
महाळूंग नगरपंचायतसाठी शासनाकडून विविध विकास योजनांमधून जवळ जवळ ६ कोटीचा निधी प्राप्त झाला असून महाळुंग नगर पंचायत .ने आॕनलाईन निविदा प्रसिद्ध केली होती.सदर निविदा बऱ्याच ठेकेदारांनी स्पर्धा करुन मुदतीच्या आत दाखल केल्या परंतू नगरपंचायतचे नगरसेवकांनाच कामे करावयाची असल्यामुळे निविदा ऊघडण्याचा कालावधी ऊलटून गेला तरी निविदा ऊघडल्या नाहीत.
कारण निविदा भरलेल्या ठेकेदारांवर दबाव टाकून आमचे टेंडर आम्ही काढून घेत आहोत असे जबरदस्तीने ठेकेदारांकडून नगरसेवक लिहून घेत आहेत.त्या मध्ये विरोधीपक्षाचे नगरसेवकही कामाचा मलीदा खाण्यासाठी सत्ताधाऱ्यांना साथ देण्यासाठी सहभागी झालेले आहेत.त्यामुळे महाळूंग नगरपचायत मध्ये विरोधी पक्ष आहे का नाही ?अशी परिस्थीती झाली आहे. तरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी ठेकेदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकार चे दबावतंञच असुन याबाबत असंतोष खदखदत आहे.



