“मानवहित लोकशाही पक्ष पश्चिम महाराष्ट्र ” उपाध्यक्ष सज्जन लोखंडे यांना “साहित्यरत्न जन्मभूमी पुरस्काराने “सन्मानित
उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.—–9730 867 448
मौजे वाटेगाव, ता.वाळवा जि.सांगली येथे साहित्यरत्न विश्वरत्न,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी ” मानवहित लोकशाही पक्ष पश्चिम महाराष्ट्र “उपाध्यक्ष — सज्जनभाऊ लोखंडे, यांना “साहित्यरत्न जन्मभूमी पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. सचिनभाऊ साठे व सावित्रीमाई साठे. यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. त्या आनुषंगाने अकलूज नगरी मधील समाज बांधवांनी सज्जन लोखंडे यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी. क्रांतिकारी संघर्ष सेनानी( महाराष्ट्र राज्य ) संस्थापक अध्यक्ष– सुधीरभाऊ साठे, जिल्हाध्यक्ष -लहुजी शक्ती सेनेचे -सागर भाऊ लोखंडे, आर. पी.आय. चे प्रवीण साळवे, शिवसेनेचे- दीपक भाऊ खंडागळे, भाजपचे- संदीप भाऊ खंडागळे, शक्ती भाऊ लोखंडे, अजय गायकवाड,विकी भाऊ खंडागळे मातंग एकता आंदोलन तालुका उपाध्यक्ष –समाधान आवारे, दादासो गायकवाड तसेच, सामाजिक कार्यकर्ते अजित सर, बापूराव रास्ते,लखन भैय्या आरडे, चंद्रकांत गवळी आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते