शहर

देशातील संस्थाने खालसा करताना डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, –चंद्रशेखर गायकवाड.

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

“स्वतंत्र भारत देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने खालसा करताना डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगादान असुन सरदार वल्लभभाई पटेल सर्व कायदेशीर सल्ला डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून घेत असत , असे विचार प्रख्यात व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांनी पळशी तालुका पंढरपूर येथे आयोजित व्याख्यानमालेत बोलताना व्यक्त केले.

हैद्राबाद संस्थान खालसा करताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी सैनिक कारवाई करून सैन्य हैद्राबाद संस्थानात पाठविण्याचा निर्णय घेतला होता , सैनिक कारवाईचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले असते आणि सदर घटनेची चर्चा युनो मध्ये झाली असती यावर डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी पोलिस अँक्शन हा पर्याय सुचविला. देशांतर्गत प्रश्नांसाठी आपण पोलिस अँक्शन वापर करू शकतो.सरदार वल्लभभाई पटेल आणि डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चर्चेतून मार्ग निघाला की निजामाची लष्करी शक्ती मोठी आहे.

त्यामुळे या मोहिमेला पोलिस अँक्शन नाव द्यायचे आणि प्रत्यक्षात सैन्य आणि पोलिस यांचा वापर करून हैद्राबाद संस्थान विलीनीकरण करायचे.१३ सप्टेंबर १९४८ ला भारत सरकारने पोलिस कारवाईचा आदेश काढला फक्त चार दिवसांत निजामाने गुडघे टेकले १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले.
संविधान कलम ५१ हे परराष्ट्रीय धोरणावर आहे
याच कलमाचा वापर करून भारत सरकारने काश्मीर मधील ३७० कलम हटविले आज हा देश सामर्थ्यशाली आणि महासत्ताशाली देशांच्या बरोबर जात आहे त्याच प्रमुख कारण आहे ज्ञानाचासागर असणाऱ्या बाबासाहेबांनी लिहलेले संविधान.त्यामुळेच आज प्रबल लोकशाही निर्माण झालेली आहे.”असे ही विचार व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

दिनांक २६/४/२३ रोजी पळशी येथील व्याख्यानमालेत समाज प्रबोधनकार मारूती जाथव तसेच मराठवाड्यातील प्रसिद्ध कवी अनिरूध्द शिंदे ,प्रमुख उपस्थितीत होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पळशीचे सरपंच रामभाऊ वाघमारे,उपसरपच दत्तू वाघमारे ,सिताराम वाघमारे,सुभाष वाघमारे,मोहन वाघमारे, समाधान जाधव यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button