पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता जनजागृती सप्ताह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
संपूर्ण महाराष्ट् राज्यात दरवर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सोमवार दिनांक 30/10/2023 ते रविवार दिनांक 05/11/2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून पालघर जिल्ह्यात भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने या सप्ताह कार्यक्रमाचा आरंभ सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह पालघर येथे पार पडला.

यावेळी गोविंद बोडके जिल्हाधिकारी पालघर यांच्या अध्यक्षतेखाली शपथ ग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शपथ ग्रहण कार्यक्रमास जिल्हाधिकारी पालघर गोविंद बोडके यांनी सर्व उपस्थित शासकीय कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना दक्षता जनजागृतीची शपथ दिली व भ्रष्टाचाराला नाही म्हणा – आपल्या राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा या शासनाने निश्चित केलेल्या संकल्पनेच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या शपथ ग्रहण कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी पालघर गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर, प्रकाश गायकवाड पोलीस उपायुक्त( मुख्यालय )वसई विरार पोलीस आयुक्तालय , पोलीस उपअधीक्षक मुख्यालय पालघर, दयानंद गावडे पोलीस उपअधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पालघर,
व सर्व शासकीय विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी व पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



