पालघर मध्ये श्री रामनवमी मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी फुलांची उधळण करून रॅलीमध्ये घेतला सहभाग

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
अखंड भारताचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्रीरामांच्या जन्मतिथि निमित्त पालघर शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते .
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही रविवार 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमी निमित्ताने भव्य मिरवणुक पालघर राम मंदिर ट्रस्ट कडून काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शेकडो रामभक्त सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमाणेच यंदाही ही यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.

या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मुस्लिम बांधवांनी भक्तीभावाने केलेले स्वागत. पालघर येथील गौसिया मस्जिद परिसरातील मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सहभागी राम भक्तावर फुलांची उधळण करत रामनवमीच्या सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून रॅलीत सहभागही नोंदवला. तसेच या दरम्यान मिरवणुकीत सामील भक्तांना पिण्याचे पाणीचे बाटल्या ही देण्यात आल्या मिरवणुकी दरम्यान प्रभु श्री रामांकडे सर्व मुस्लिम समाजा तर्फे सर्व जाती, सर्व धर्मांचे लोकं मिळून मिसळून आनंदी राहण्यासाठी व आपल्या सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्याची प्रार्थना करण्यात आली.




