शहर

खासदार राजेंद्र गावित यांच्या विकास कामाच्या संधीचा फायदा घेऊन हबीब शेख यांनी बनावट लेटरहेड तयार करून 10 कोटी रुपयांचा निधी केला मंजूर

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाचा बनावट लेटरहेड आणि बनावट सह्या करून मोखाडा तालुक्यात 10 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळवणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य तसेच अर्बन बँकेचे चेअरमन हबीब शेख याला स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलिसांनी वसई येथे अटक करून जव्हार पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी त्यांच्या विरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा भागात गेल्या काही वर्षापासून 500 कोटी रुपयांच्या वर विकास कामे झाली आहेत.

या विकास कामांमध्ये सर्वाधिक जास्त विकास कामे खासदार राजेंद्र गावित यांच्या कारकीर्द मंजूर झाली आहेत.या संधीचा फायदा घेत हबीब शेख यांनी पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाचा लेटरहेड बनवून मोखाडा विहिगाव खोडाला या भागात 10 कोटी रुपये किमतींच्या कामाला नवी मंजुरी मिळवून घेतली होती. या कामांना अर्थसंकल्पीय निधी मंजूर प्रसिद्ध झाल्यावर ही बाब पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांच्या लक्षात आल्यावर याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर हबीब शेख यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाचा लेटरहेड बनवून खोट्या सह्या करून राजमुद्राचा गैरवापर करून या कामांना मंजुरी मिळवली होती.

याबाबत खासदार रवींद्र गावित यांचे स्वीय सहाय्यक यांनी शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यावरून पालघर स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हबीब शेख याला वसई पोलिसांच्या मदतीने वसई येथे अटक करून जव्हार पोलिसांच्या स्वाधीन केल्यावर जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी हबीब शेख यांच्याविरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button