पिंपरी बुद्रुक सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र मगर तर उपाध्यक्षपदी युवराज गायकवाड यांची बिनविरोध निवड

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123
पिंपरी बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र विष्णू मगर तर उपाध्यक्षपदी युवराज तानाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद राऊत यांनी सदरची निवड प्रक्रिया पार पाडली.
पिंपरी बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष निलेश मच्छिंद्र बोडके व उपाध्यक्ष दत्तात्रेय आबा नरूटे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सदरची निवड करण्यात आली. सदरच्या सोसायटीवर मागील वर्षी भाजपा पुरस्कृत पॅनलची एकहाती सत्ता आली आहे.

इंदापूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात सदर निवडीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. ठरल्याप्रमाणे अध्यक्ष पदाकरीता राजेंद्र विष्णू मगर तर उपाध्यक्ष पदाकरीता युवराज तानाजी गायकवाड यांचे दोघांचेही अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संजय बोडके, प्रदिप बोडके, विष्णू काटकर, सुनिल बोडके, तुकाराम बोडके आदि उपस्थित होते.



