बोईसर येथे घरफोडी करून फरार केळवा रोड येथील दोन युवकांना 14 लाख 23 हजार रुपयांच्या मुद्देमाला सह जेरबंद करण्यात बोईसर पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या पथकाला यश.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे घरफोडी करून फरार झालेल्या केळवा रोड येथील दोन चोरांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातील 14 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या पथकाला यश आले आहे.

23 जुलै 2023 रोजी स्वप्निल रमेश पाटील वय वर्ष (28) आणि स्वप्निल सतीश पाटील वय वर्ष (24) राहणार गायत्री नगर दसरमाळ केळवा रोड या दोघांनी आपली ओळख लपवण्यासाठी अंगात रेनकोट व हेल्मेट घालून बोईसर येथील इन्स्टाकार्ड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड शाखा बोईसरच्या गाला नंबर 11 चे शटर लॉक तोडून बंद कपाटातील 10 लाख 51 हजार रुपये रोख रक्कम व 3 लाख 77 हजार रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि सौंदर्य प्रसाधने असा एकूण 14 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून फरार झाले होते.

या घरफोडीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मणिकेरी, पोलीस हवालदार सुरेश दुसाने, शरद सानप, विजय दुबला, राहुल पाटील, पोलीस नाईक योगेश गावित, रमेश पावले,पोलीस शिपाई राहुल क्षत्रिय, सागर जाधव, मच्छिंद्र घुगे, संतोष वाकचौर , देवेंद्र पाटील,धीरज साळुंखे, मयूर पाटील या सर्वांची वेगवेगळी पथके करून तांत्रिक कौशल्याच्या आधारे तसेच गुप्त बातमीदार यांच्या मार्फत तपास करून स्वप्निल रमेश पाटील याला बोईसर यशवंत सृष्टी येथून तर स्वप्निल सतीश पाटील याला त्याच्या केळवा रोड येथील राहत्या घरातून अटक करून या दोघांवर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातील 14 लाख 23 हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल हस्तगत केला आहे.



