कदेर ता.उमरगा येथील छञपती शिवाजी महाराज चौकात विद्युत लाईट बसवण्याची हिंदवी स्वराज्य संघटनेची मागणी

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.——9730 867 448
कदेर ता. उमरगा जि.उस्मानाबाद येथील शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्युत रोषणाई करुन प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी यासाठी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने ७ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे सात दिवसात जर विद्युत रोषणाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कदेर गावचे सरपंच सतीश जाधव यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
दिनांक २६/०७/२०२३ रोजी स्वराज्य संघटना आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान कदेरच्या वतीने निवेदन देण्यात आले छञपती शिवाजी महाराज चौकात विजेचा खांब लावण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून तरुण वर्गाकडून होत आहे; आणि ही मागणी पूर्ण करावी यासाठी गावचे सरपंच सतीश जाधव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे

या प्रसंगी स्वराज्य संघटनेचे लोहारा तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात, उपाध्यक्ष तानाजी पाटील, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष नरेश भोसले , युवा सेना शाखाप्रमुख कपिल गायकवाड, विशाल बिराजदार,राम जाधव, धीरज औरादे, राहुल मानेगोपाळे,भास्कर कदम, अनिकेत औरादे, रोहन गायकवाड, सुमित जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते .



