पालघर कोर्टाने आकाश चौधरी मृत्यू प्रकरणात कुणाल पाटील यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.
रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी गटारी अमावस्येच्या दिवशी 26 वर्षीय अविवाहित आकाश चौधरी याचा सफाळे येथील मेन रस्त्यावर फ्लेवर रेस्टॉरंट शेजारी कुणाल पाटील यांची MH-12 UJ 2296 क्रमांकाची किया कंपनीची कार अंगावरून नेल्यामुळे त्याचा शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

या प्रकरणात पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष लक्ष देऊन मार्गदर्शन करून सफाळे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशांचे पालन करून कुणाल पाटील यांना सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी अटक करून पालघर कोर्टात हजर केले असता

पालघर कोर्टाने त्याला 14 दिवसांची 8 ऑगस्ट 2023 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची गाडी जप्त करून त्याची रवानगी 26 जुलै 2023 रोजी ठाणे कारागृहात केली आहे.



