महाराष्ट्र

मणिपूर राज्यात राष्ट्रपती लागवड करावी वंचित बहुजन विकास आघाडी पालघर यांच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.

मणिपूर राज्यातील हिंसक आंदोलन राज्यातील दलित व आदिवासी महिलांवर अत्याचार करून त्यांना नग्न करून त्यांची धिंड काढून बलात्कार करणे अशी मानवतेला काळीमा फासणारी अमानवी राक्षसी कृत्य केली जात आहे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे. मणिपूर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री ए.न बिरेन हे त्यांच्या राज्यातील महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत.

यामुळे मणिपूर राज्यात राष्ट्रपती लागवड लागू करण्यात यावी व या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्ह्याच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्फत मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी माननीय राष्ट्रपती भारत सरकार द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी पक्षाचे लढाऊ कार्यकर्ते शिवविलास सोनकांबळे जिल्हा अध्यक्ष पालघर
संदेश मोरे जिल्हा महासचिव पालघर,
रत्नदिप पाखरे जिल्हा उपाध्यक्ष पालघर,
संजय ढोके जिल्हा उपाध्यक्ष पालघर,
विवेक राऊत जिल्हा सचिव पालघर
अधिकार जाधव जिल्हा सचिव पालघर,व
श्रीकृष्ण अनभोरे
इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button