माझी वसुंधरा अभियानांतर्गत पिंपरी बुद्रुक येथील मुली व महिलांना शिलाई मशिन कोर्सचे प्रशिक्षण

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123
माझी वसुंधरा अभियानांतर्गत पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) ग्रामपंचायत येथे दि ब्रिलीयंट हेल्थ ॲड ॲग्री संस्थेच्यावतीने महिलांसाठी मोफत कौशल्य विकास स्वयंरोजगार प्रशिक्षण शिलाई मशिन कोर्स उपलब्ध करून देण्यात आला. त्यामध्ये १०५ महिलांनी सहभाग नोंदवत प्रशिक्षण घेतले.

सखी महिला व्यवसाय व कौशल्य विकास केंद्र यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून मुली व महिलांना एक महिन्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन पिंपरी बुद्रुकच्या सरपंच ज्योती श्रीकांत बोडके यांच्या हस्ते झाले.

यावेळी श्रीकांत बोडके, उपसरपंच पांडुरंग बोडके, ग्रामसेवक गणेश लंबाते, ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री बोडके, अनुराधा गायकवाड, सुनिता शेंडगे ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रशिक्षणार्थी महिलांना रोप व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.




