बकरी ईद शांती आणि सांमजस्य ठेवून साजरी करा…शांतता कमिटी च्या मीटिंग मध्ये अकलूज पोलिस स्टेशन चे पी आय निंभोरे साहेब यांनी केले आवाहन…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
बकरी ईद निमित्त शांतता कमिटी ची मीटिंग अकलूज पोलीस स्टेशन येथे नव निर्वाचित पी आय निंभोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती,17 जून रोजी येणारी बकरी ईद शांती आणि सांमजस्य ठेवून साजरी करा असे आवाहन पी आय निंभोरे साहेब यांनी समस्त मुस्लिम समाजाला केले…

मुस्लिम समाजातील अनेक कार्यकर्त्या सह संवाद साधत समाजाच्या चौकटीत येणारे प्रश्न हि त्यांनी हाताळले,या वेळी त्यांनीं विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात बोलावलेली मीटिंग पी आय निंभोरे साहेब यांच्या मुळे जबाबदारीची जाणीव हि करून गेली…
शेवटी बोलताना पी आय निंभोरे साहेब यांनी शांतता कमिटी च्या मीटिंग साठी आलेल्या मुस्लिम समाज बांधवांना बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या…

या वेळी मुस्लिम समाजाचे नेते ऍड वजीर शेख,असलमभाई सय्यद,बागवान समाजाचे भैय्या मांढेकर,भाजपा अल्पसंख्यांक चे मुख्तारभाई कोरबु,राष्ट्रवादी चे मोहसिन शेख,कबीर मोरे,जावेद (बाबा) तांबोळी,सलीम सय्यद,रफिकभाई कोरबू,सलीमभाई शेख,हमीद भाई मुलाणी संग्रामनगर,सीफ तांबोळी,समीर सौदागर,तय्यब कुरेशी,अमन बागवान,टाइम्स 9 मराठी न्युजचे संपादक नौशाद मुलाणी आणि टाइम्स 9 मराठी न्युज चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्या सह बहुसंख्य मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते…



