सध्या देशात व राज्यात राजकारणाला पर्याय म्हणून जनता दल युनायटेड फ्रंट लोकापर्यंत घेऊन जाण्याचा आमचा निर्धार,कामगार संघटनांना एकत्र करणारजनता दल युनायटेड फ्रंटचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट आजिनाथ शिंदे

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
सध्या देशात आणि राज्यात सुरू असलेल्या राजकारणाला पर्याय म्हणून जनता दल युनायटेड लोकापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार आम्ही केला असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच आमदार कपिल पाटील आणि शशांकराव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यभर जनता दल युनायटेड विस्तारासाठी मोठ्या ताकदीने काम करणार असल्याची ग्वाही जनता दल चे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट आजिनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना माहिती दिली

याबाबत अधिक माहिती देताना एडवोकेट शिंदे पुढे बोलताना म्हणाले की राज्यातील समाजवादी जनता प्रवाहाचे पुनर्गठन व एकजूट करण्याचा आमचा निर्धार असून त्या दृष्टिकोनातून जनता दल युनायटेड च्या माध्यमातून आम्ही एकजुटीने नवा राजकीय पर्याय उभा केला असून आमचे नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वामुळे देशभर एकजुटीला चालना मिळाली असून महाराष्ट्रातही त्यासाठी जनता दल युनायटेड फ्रंटचे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती जनता दल ल युनायटेड फ्रंटचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट आजिनाथ शिंदे यांनी बोलताना माहिती दिली समाजवादी जनता परिवाराला मानणारा एक मोठा वर्ग आज राज्यात आहे या प्रवाहाच्या एकजुटीसाठी जनता दल महाराष्ट्राच्या वतीने राज्यभर बैठका भेटी गाठी यांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी स्वतः आमदार कपिल पाटील हे दौरे करणार असल्याची माहिती शिंदे यांनी बोलताना दिली

कामगार संघटनांना एकत्र करणार,,,,,,
कष्टकरी कामगार शेतमजूर आणि इतर असंघटित क्षेत्रामध्ये समाजवादी विचारांच्या संघटना आजही कार्यरत आहेत त्या सगळ्या संघटनांना बरोबर घेऊन समाजवादी जनता परिवाराची एकजूट करण्याचा ठराव आमच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती श्री शिंदे यांनी बोलताना दिली त्यासाठी प्रदेशाध्यक्ष कामगार नेते शशांकराव यांनी पुढाकार घेतला असल्याचे शिंदे यांनी बोलताना सांगितले

बी बियाणे आणि खतासाठी मदत करा,,,,,,,,,,,,,
राज्यात सध्या दुबार पेरणीचे संकट आले असून शेतीचा हा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली होती मात्र शेती आणि शेतकरी यांच्यावर दूरगामी विपरीत परिणाम होतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे सध्या चाललेल्या सत्ता संघर्षातून वेळ काढून सरकारने शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल त्यांना बी बियाणे आणि खतासाठी मदत केली पाहिजे अशी मागणी शिंदे यांनी बोलताना केली पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर सांगली सहक काही भाग मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद बीड हे जिल्हे उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर नाशिक जळगाव चा काही भाग आणि विदर्भातील बहुसंख्य भाग येथे शेतकऱ्यांच्या काही ठिकाणी अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत काहींना दुबार पेरण्या कराव्या लागणार आहेत त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याची माहिती शेवटी एडवोकेट अजिनाथ शिंदे यांनी बोलताना दिली



