सफाळे विळंगी गावचे उपसरपंच आणि मनसे पालघर तालुका उपाध्यक्ष यांना जबरी मारहाण करणाऱ्या आई, मुलगा आणि वडील यांचा जामीन नामंजूर… तिन्ही आरोपींची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
पालघर जिल्ह्यातील सफाळे विळंगी गावचे उपसरपंच आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर तालुका उपाध्यक्ष चेतन पाटील यांना लोखंडी रॉडने जबरी मारहाण करणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन आरोपींना पालघर कोर्टाने शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी 2023 रोजी जामीन नामंजूर केल्यामुळे या तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींची रवानगी शुक्रवारी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
20 सप्टेंबर 2023 रोजी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गावातील ग्रामस्थ रस्त्याने जात असताना वैभव पाटील (आरोपी )यांनी आपल्या चिकन शॉप मधील कोंबडीच्या रक्ताचे पाणी भर रस्त्यात सोडले होते. यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत उपसरपंच चेतन पाटील यांनी वैभव पाटील यांना हे पाणी येथे सोडू नका असे सांगितल्यावर त्याचा राग मनात धरून 20 सप्टेंबर 2023 रोजी वैभव पाटील (मुलगा )उषा पाटील(आई )आणि राजेंद्र पाटील (वडील) या तिघांनी चेतन पाटील यांना लोखंडी रॉडने जबरी मारहाण केली होती. या प्रकरणी 20 सप्टेंबर 2023 रोजी केळवा सागरी पोलीस ठाणे येथे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या तिन्ही आरोपींना शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी केळवा सागरी पोलिसांनी पालघर कोर्टात हजर केले असता उषा पाटील (आई) राजेंद्र पाटील( वडील) आणि वैभव पाटील (मुलगा) या तिघांनी चेतन पाटील यांना लोखंडी रॉडने जबरी दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आहे आहे . तसेच चेतन पाटील यांना झालेली दुखापत ही गंभीर स्वरूपाची आहे असा अहवाल डॉक्टरांनी दिल्यावर या अहवालाच्या आधारावर पालघर कोर्टाने वैभव पाटील (मुलगा), उषा पाटील,(आई),राजेंद्र पाटील (वडील)या एकाच घरातील तीन आरोपींचा जामीन नामंजूर करून या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वे 27 ऑक्टोबर 2023 रोजी तिघांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.



