खासदार राजेंद्र गावित यांच्या मागणीला यश.. 31 मार्च पासून वांद्रे-अजमेर तसेच मैसूर-अजमेर या सुपरफास्ट गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकात थांबा

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
रेल्वे प्रशासनाने पालघर रेल्वे स्थानकावरील कोविड काळात बंद केलेले वांद्रे-अजमेर तसेच मैसूर -अजमेर या गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यात खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नांना यश आले आले असून शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 पासून या गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेचे पालघर हे रेल्वे स्थानक पालघर जिल्ह्याचे महत्वाचे रेल्वे स्थानक असल्यामुळे या रेल्वे स्थानकाला महत्त्वाचा दर्जा प्राप्त झाला. आहे.असे असताना देखील कोविड कालावधीत रेल्वे प्रशासनाने पालघर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरील सुपरफास्ट गाड्यांचे थांबे काढून टाकल्यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान समस्यांचा सामना करावा लागत होता याबाबत या भागातील रेल्वे प्रवाशांनी खासदार राजेंद्र गावित यांच्याशी संपर्क करून पालघर स्थानकातील अनेक सुपरफास्ट गाड्यांचे काढून टाकण्यात आलेले थांबे पूर्ववत करण्याची मागणी केली होती.
याबाबत खासदार गावित यांनी दिल्ली आणि मुंबई बोर्ड येथील रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेऊन आणि संपर्क साधून वांद्रे- अजमेर,मैसूर- अजमेर अशा गाड्यांचे पालघर रेल्वे स्थानकातील थांबे पूर्ववत करावी अशी मागणी केली होती त्यांच्या या मागणीला यश आले असून शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 पासून या वरील गाड्यांचे थांबे पालघर रेल्वे स्थानकात पूर्ववत करण्यात आले आहेत.



