महाराष्ट्र

“लोकसंचालित साधन केंद्र”- खडूस ,यांची 6 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .—–97 30 867 448

महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत आकांशा लोकसंचलित साधन केंद्र खुडूस यांच्या 6 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली असुन त्या निमित्त प्रतिमेचे पूजन, उत्कृष्ट बचत गटांना बक्षीस वितरण व ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्यावतीने विजयश्री मोफत उपचार कार्ड सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

या प्रसंगी माजी सरपंच राजवर्धिनी माने पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सुनंदाताई फुले, माजी पंचायत समिती सदस्या हेमलता चांडोले, हसीना शेख ,जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लांमगुंडे , सहाय्यक जिल्हा समन्वयक सतीश भारती, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजित शेंडे , तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव , व्यवस्थापक दत्तात्रय गोरे ,लेखापाल विशाल पिसे, आकांशा लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा कविता खरात ,

सचिव सोनाली ठवरे , साधन केंद्राच्या सर्व कार्यकारी सदस्या, बचत गटांच्या महिला बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्यप्रभादेवी मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितले कि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार- रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार -राम सातपुते यांच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button