शहर

पालघर जिल्ह्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील शाळांना पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केली सुट्टी जाहीर.( फक्त एक दिवस)

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्ह्यातील वसई पालघर, डहाणू तलासरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 19 जुलै रोजी पालघर जिल्हयाला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

याचा विचार करता, वसई, पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक 19 जुलै 2023 रोजी ( फक्त एक दिवस) पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

वसई, पालघर, डहाणू व तलासरी या तालुक्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा,

सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक 19 जुलै रोजी (फक्त एक दिवस) जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button