महाराष्ट्र

शिंदे फडणवीस पवार मंत्रीमंडळात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला सत्तेत वाटा मिळालाच पाहिजेकार्यकर्ते आग्रही

बी टी शिवशरण

आरपीआय आठवले गट व भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांचें बरोबर गेल्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत युती झाली आहे ती कायम राहिली आहे पुढील निवडणुकीत ही त्यांच्या बरोबर युती राहिलं अशी स्पष्ट भूमिका आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी जाहीर केली आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सध्याच्या शिंदे फडणवीस पवार यांच्या राज्यमंत्री मंडळात आरपीआय आठवले गटाला एक क्याबीनेट व एक राज्यमंत्री पद देऊन युतीचा राजधर्म भाजपने पाळावा अशी आग्रही मागणी आरपीआयचे कार्यकर्त्यांनी केली आहे

महाराष्ट्रात रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाची राजकीय सामाजिक ताकद मोठी आहे या पक्षाचे कार्यकर्ते रामदास आठवले व प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे नेतृत्वाखाली काम करताना समाजात गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात मोठ्या हिरीरीने ताकदीने सक्रिय राहुन काम करत असतात त्यामुळे रामदास आठवले यांच्या पक्षाबरोबर ज्यांची निवडणूक युती राहते त्यांची सत्ता कायम येते हा रामबाण उपाय आहे त्यामुळे गत विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आरपीआयचे कार्यकर्त्यांनी युतीचा राजधर्म प्रामाणिक पाळला आहे त्यामुळे सत्तेत आरपीआयला वाटा सन्मानाने देण्याची नैतिक जबाबदारी शिंदे फडणवीस पवार सरकारने स्विकारुन कार्यकर्त्यांची मागणी पुर्ण करावी

गावपातळीपासून ते राज्यपातळी वरील कार्यकर्ते सतर्क झाले आहेत सत्तेत सहभागी होण्यासाठी आरपीआयचे वरिष्ठ नेते पदाधिकारी यांचेवर दबाव आणला जात आहे आरपीआय आठवले गटाला निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे संपुर्ण राज्यभर पक्षाचे सभासदत्व नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे क्रियाशील सभासद करणे पक्ष बांधणी पदाधिकारी निवड यावर भर देण्यात आला आहे पक्षाची सामाजिक राजकीय ताकद पहाता कार्यकर्ते पुढील वाटचालीसाठी जोमाने कामाला लागले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button