महाराष्ट्र

पावसाळी अधिवेशन 2023 अर्थ संकल्पात माळशिरस तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ६० कोटी रूपये मंजूर

उपसंपादक हुसेन मुलाणी

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात जुलै २०२३ मध्ये माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आमदार .रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून ६० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

तालुक्यातील २९ रस्त्यांसाठी एक ३०.८० कोटी रूपये मंजूर झाले आहेत यात राज्यमार्गासाठी ५ कोटी रूपये, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गासाठी २५.८० कोटी तालुक्यातील ५ पूल बांधण्याकरीता १९.१३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
माळशिरस येथील न्यायाधीशांचे निवासस्थानाच्या बांधकामाकरीता ८.९० कोटी तर दुय्यम निबंधक कार्यालय बांधकामास १.६६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विविध विकास कामांकरिता ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button